आपले सहर्ष स्वागत आहे.
सोनाळी हे गाव करवीर तालुक्यात, कोल्हापूर जिल्ह्यात, महाराष्ट्र राज्यात वसलेले एक शेतीप्रधान व शांत ग्रामीण गाव आहे.
गावाचे प्रशासन ग्रामपंचायतीमार्फत चालते व स्थानिक विकासकामे, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते व शासकीय योजना राबविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे असते.
गावाची लोकसंख्या सुमारे १४०० च्या आसपास असून साक्षरतेचे प्रमाण चांगले आहे. येथे ऊस, भात, ज्वारी व भाजीपाला ही मुख्य पिके घेतली जातात तसेच काही नागरिक दुग्धव्यवसाय व लघुउद्योग करतात.
गावात प्राथमिक शाळा, अंगणवाडी व धार्मिक स्थळे आहेत आणि कोल्हापूर शहराशी रस्तेमार्गे चांगला संपर्क उपलब्ध आहे.
गावातील धार्मिक स्थळांना विशेष महत्त्व आहे. ग्रामदैवताचे मंदिर हे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असून येथे दरवर्षी यात्रा व जत्रा भरते.
तसेच गणपती, हनुमान, शिव मंदिर यांसारखी मंदिरेही आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, शिवजयंती आणि इतर सण गावात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे गावात एकोपा व सामाजिक ऐक्य टिकून आहे.
- गावातील 100% विधवा महिलांना विधवा सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. हे आपल्या गावचे नावीन्यपूर्ण काम आहे
- महिला सभा
- प्लास्टिक बंदी जनजागृती करणे करिता दुकानदारांना नोटीस लागू करतेवेळीचे आहेत